राज्यात टोलनाक्याबाबत स्फोटक वक्तव्य करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातर्गत अटक करा, अशी मागणी आरपीआय खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. सांगलीत पत्रकारांशी संवाद साधताना खरात म्हणाले ," राज ठाकरे हे वैचारिक गोंधळलेले नेते असून त्यांची मराठी पाटी आणि टोलनाका ही आंदोलने ठरवलेली आहेत."
पुढे ते म्हणाले ,"राज्यात चारचाकी वाहनांना टोल घेतला जात नाही या फडणवीस यांच्या वक्तव्याबाबत राज्यात चारचाकी वाहनांना टोल घेतला जातो असे सांगत भाजपचा मित्रपक्ष असूनही आम्ही टोल भरतो. असेही खरात यांनी सांगत त्यामुळे फडणवीस साहेबांचे वक्तव्य प्रशासकीय असल्याचा दावा केला.