Wednesday, November 13, 2024 09:23:54 PM

स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा

स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा

लखनऊ, २० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षातील सर्व पदांचा आणि विधान परिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर मौर्य यांनी राष्‍ट्रीय शोष‍ित समाज पक्ष नावाने स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. या पक्षाचा झेंडा त्यांनी प्रसिद्ध केला आहे. या झेंड्यात निळ्या, लाल आणि हिरव्या रंगाच्या पट्ट्या आहेत. झेंड्यावर RSSP असे लिहिले आहे. स्वामी प्रसाद मौर्य त्यांची राजकीय भूमिका जाहीर करण्यासाठी गुरुवार २२ फेब्रुवारी रोजी तालकटोरा स्टेडियममध्ये सभा घेणार आहेत. ते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार आहेत.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo