छ्त्रपती संभाजीनगर, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर येथे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाठ यांनी पत्रकार परिषद घेतली आहेत. या पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक वक्तव्ये केली.
शिरसाठ यांच्या पत्रकार परिषदतील महत्त्वाचे मुद्दे
लोकसभेच्या जागांबाबत अजूनही बोलणी सुरु आहे - शिरसाठ
संभाजीनगर जागा आम्हाला हवी असा आग्रह आहे, यावर एकमत होऊ शकते - शिरसाठ
उमेदवार कोण असेल याचा निर्णय शिंदे साहेब घेतील - शिरसाठ
मात्र ही जागा जिंकून आणणे गरजेचे आहे - शिरसाठ
भाजपने वाद नसलेल्या जागा जाहीर केल्या आहेत - शिरसाठ
आमची यादी 2 दिवसात जाहीर होईल - शिरसाठ
ओढाताण असलेल्या जागांचा तिढा 24 तासात संपेल - शिरसाठ
कुठलीच अडचण कुठेच होणार नाही - शिरसाठ
निर्णय एकमताने होतात - शिरसाठ
आज राहुल गांधी आल्याने राऊतांची दिवाळी असल्यामुळे ते टाळ्या वाजवण्यात व्यस्त आहे - शिरसाठ
आम्हाला लोकसभा जिंकायची आहे - शिरसाठ
त्यामुळे कुठं कमी कुठं जास्त होऊ शकते - शिरसाठ
काही तिकीट कापू शकतात मात्र शिंदे निर्णय घेतील - शिरसाठ
सोमवारी अनेक गोष्टी कळतील काही भूकंप पाहायला मिळतील - शिरसाठ
तिकीट कापणार नाही तर काही बदल होणार आहे बदल नैसर्गिक असतात - शिरसाठ
भाजपाच्या यादीत ४ लोकांचे तिकीट कापले हे बदल आहेत - शिरसाठ
किमान २ ते ३ ठिकाणी बदल होऊ शकतात - शिरसाठ