Thursday, December 12, 2024 06:44:13 PM

राज्यात मोदी-शाहांच्या सभांचा धडाका

राज्यात मोदी-शाहांच्या सभांचा धडाका

मुंबई, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्रात लवकरच मोदी-शाहांच्या सभांचा धडाका चालु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाच सभांचे आयोजनकरण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याही राज्यात तीन सभा होणार आहेत. अमरावतीमध्ये  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २२ एप्रिलला विरोधकांचा समाचार घेणार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये २४ एप्रिल, तर २६ एप्रिलला सोलापूरमध्ये अमित शाह विरोधकांवर बरसणार आहेत. पंतप्रधान मोदींची २९ एप्रिलला लातूर, पुणे येथे जाहीर सभा आहे. सोलापूर, सातारा, माढा लोकसभांमध्ये ३० एप्रिलला मोदींची तोफ धडाडणार आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo