Saturday, January 18, 2025 07:15:15 AM

लोकसभेच्या रिंगणातून विनोद पाटलांची माघार

लोकसभेच्या रिंगणातून विनोद पाटलांची माघार

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी, दि. २४ एप्रिल २०२४ : सध्या लोकसभा निवडणूकांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून विनोद पाटलांची माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे.


मागील गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा महायुतीकडून मला द्या अशी मागणी करणारे मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढा दिलेल्या विनोद पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यांनी बुधवारी (दि. २४ एप्रिल २०२४) कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही घोषणा केली. लोकसभा निवडणूक न लढवता तटस्थ राहण्याची भूमिका विनोद पाटील यांनी घेतली आहे.


काय म्हणाले विनोद पाटील ?
कुणाला पाठिंबा न देता, कोणत्या पक्षासोबत न जाता आणि अपक्ष निवडणूक न लढवता तटस्थ राहिले पाहिजे, अशी त्यांची भूमिका असल्याचे ते म्हणाले.


सम्बन्धित सामग्री