Thursday, December 12, 2024 06:38:50 PM

'अयोध्येत नाक घासा मग प्रचार करा'

अयोध्येत नाक घासा मग प्रचार करा

अमरावती, २४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अयोध्येत नाक घासा मग प्रचार करा, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसच्या राहुल गांधींना दिला. अमित शाह अमरावती जिल्ह्यातील सभेत बोलत होते. अमरावतीत महायुतीसाठी भाजपाच्या तिकिटावर लढत असलेल्या नवनीत राणांच्या प्रचारासाठी केलेल्या भाषणात अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका केली. काँग्रेस पक्षच राम मंदिराच्या निर्मितीत अडचणी आणत होते. पण मोदी सरकारच्या नेतृत्वात सर्व अडचणींवर मात करण्यात आली आणि राम मंदिराची निर्मिती झाली, असे अमित शाह म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=9TU1eQfWagc

अमित शाह यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

'उद्धवनी बाळासाहेबांचे संस्कार झटकले'
'एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या संस्काराचे वारसदार'

'ना तिहेरी तलाक, ना काँग्रेस परत येईल'
अमित शाह यांच्याकडून आश्वासन

'आरक्षण हटवणार नाही, हा मोदींचा शब्द'
अमित शाह यांच्याकडून आश्वासन

'पवार, माफी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची मागा'
अमित शाह यांनी शरद पवार यांना सुनावले

'आधी अयोध्येत नाक घासा मग प्रचार करा'
अमित शाह यांचा राहुल गांधी यांना सल्ला

राममंदिर बनण्यात काँग्रेस अडसर - अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडून श्रीराम आणि शिवरायांचा जयकार

शिवरायांनी भारतात हिंदुपदपातशाही आणली - शाह

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

जगभरात राहुल देशाची बदनामी करतात - शिंदे
लोक २०३४मध्येही राहुलना सत्ता देणार नाहीत - शिंदे

'अमित शाह बंद दरवाजाआड शब्द देत नाहीत'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

'जिथे सगळे थांबतात तिथे अमित शाह सुरु होतात'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

'अमित शाह महाराष्ट्राचे जावई असणे अभिमानास्पद'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

'राऊत तर उद्धवना पंतप्रधान बनवायला निघालेत'
विरोधक राहुलना नेता मानत नाहीत - फडणवीस

        

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo