Wednesday, December 11, 2024 10:19:12 PM

फडणवीस, अजित पवारांची तोफ धडाडणार

फडणवीस अजित पवारांची तोफ धडाडणार

पुणे, १० मे २०२४, प्रतिनिधी : भोसरीत शुक्रवारी, १० मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे. सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भोसरीत सभा होणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री मैदानात उतरले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी भोसरीत सायं. ६ वाजता विजय संकल्प सभा घेणार आहेत. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी भोसरीत महायुतीकडून शक्ती प्रदर्शनही करण्यात येणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=qN9qH0DjXaM


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo