पुणे, १० मे २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांसाठी शरद पवारांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राशपचे शरद पवार यांची शुक्रवारी, १० मे रोजी सभा होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता पुण्यातील चंदननगर येथे हि जाहीर सभा नहोणार आहे. काँग्रेस नेता रमेश चैन्नीथला, बाळासाहेब थोरात हे सुद्धा या सभेला उपस्थित असणार आहेत. पुणे, मावळ, शिरूर या मतदारसंघासाठी १३ मे, २०२४ रोजी चौथ्या टप्प्यात निवडणूका पार पडणार आहेत. चौथ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचारासाठी उरले अवघे काही तास उरले आहेत.