Thursday, December 05, 2024 06:07:46 AM

'भारताने पाकिस्तानचा आदर राखावा'

भारताने पाकिस्तानचा आदर राखावा

नवी दिल्ली, १० मे २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसचे नेते करत असलेल्या वक्तव्यांमुळे नव्या वादांना सुरुवात होण्याचे सत्र सुरू आहे. आधी वारसा कर आणि भारतीयांबाबत वर्णद्वेषी वक्तव्य करून इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष सॅम पित्रोडा यांनी वाद निर्माण केला. प्रकरण चिघळल्यावर पित्रोडा यांनी राजीनामा दिला. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे.

पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे त्यामुळे भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे, असे मणिशंकर अय्यर यांनी एका मुलाखतीत सांगितले. आपण पाकिस्तानचा आदर केला नाही तर ते भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याचा विचार करू शकतात, असेही मणिशंकर अय्यर म्हणाले.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo