पुणे, १० मे २०२४, प्रतिनिधी : राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे शुक्रवारी पुण्यात असणार आहेत. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मनसेचे नेता राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी शिउबाठाचे नेता आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची पुण्यातील सारसबागेच्या चौकामध्ये जाहीर सभा होणार आहे. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी पुण्यात प्रचार फेरी काढणार आहेत. पुणे शहरातील मध्यवर्ती रस्त्यावरून ही प्रचार फेरी निघेल.
पुणे, मावळ, शिरूर या मतदारसंघासाठी १३ मे, २०२४ रोजी चौथ्या टप्प्यात निवडणूका पार पडणार आहेत. चौथ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचारासाठी उरले अवघे काही तास उरले आहेत. अशातच, महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचार सभा आणि प्रचार फेऱ्या जोरात सुरु आहेत.