Saturday, November 09, 2024 12:06:46 PM

केतकी चितळेचा उद्धवना चिमटा

केतकी चितळेचा उद्धवना चिमटा

मुंबई, १० मे २०२४, प्रतिनिधी : मराठी अभिनेत्री केतकी चितळेने शिउबाठाच्या उद्धव यांना उद्देशून समाजमाध्यमात एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट व्हायरल होत आहे. काही महिन्यांपूर्वी केतकी चितळेने शरद पवारांच्या विरोधात एक कविता केली होती. या प्रकरणात केतकीला काही दिवस तुरुंगात जावे लागले होते. आता समाजमाध्यमातील एका पोस्टमुळे केतकी नव्याने चर्चेत आली आहे.

काय आहे केतकी चितळेची पोस्ट ?

लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला ?
लकी पेट्रोल पंप उडाला (जो आम्हाला त्या वेळी ट्रक टायर फुटले असावे, असे वाटले आवाज ऐकून) त्यातील आरोपीला स्टार प्रचारक म्हणून मिरवताय ?!!
कीर्तीकरांना तसेही मी मत देणार नव्हतेच पण आज बाळासाहेबांमुळे जो काही ०.०००१% आदर मनात होता तुमच्याविषयी, तो ही तुम्ही मातीत मिळविण्यात यशस्वी झालात.
राग, चीड, द्वेष, संताप अशा भावना देखील मनात येत नाहीयेत; येते आहे ती फक्त कीव.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo