पुणे, ११ मे २०२४, प्रतिनिधी : चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा शनिवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पुण्यात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचार सभा आणि प्रचार फेऱ्यांचा धडाका पाहायला आहे.
शनिवारी ११ मे रोजी, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ सांगता सभा होणार आहे. नारायणगाव येथे अमोल कोल्हे यांची सांगता सभा होणार आहे. या सभेसाठी शरद पवार, आदित्य ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, भास्करराव जाधव, चंद्रकांत हंडोरे, प्रवीण गायकवाड उपस्थितीत राहणार आहेत. तर, शिवाजी आढळराव आणि श्रीरंग बारने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात प्रचार फेरी काढणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळेही मैदानात उतरल्या आहेत. सुप्रिया सुळे कोथरूड, शिवाजीनगर, पर्वती या भागात प्रचार फेरी काढणार आहेत.
शनिवारी, सायंकाळी ६ वाजता प्रचार बंद करावा लागणार आहे. सोमवारी, १३ मे रोजी चौथ्या टप्प्यातील निवडणूक पार पडणार आहेत. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील निवडणूक पार पडणार आहेत.