पुणे, ११ मे २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या आहेत. चौथ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचारासाठी शनिवार शेवटचा दिवस आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी राशपच्या सुप्रिया सुळे प्रचार करणार आहेत. शनिवारी, ११ मे रोजी
सुप्रिया सुळे कोथरूड, शिवाजीनगर, पर्वती या भागात प्रचार फेरी काढणार आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकरांच्या विरुद्ध महायुतीचे मुरलीधर मोहोळ निवडणूक लढवणार आहेत.
शनिवारी, सायंकाळी ६ वाजता प्रचार बंद करावा लागणार आहे. सोमवारी, १३ मे रोजी चौथ्या टप्प्यातील निवडणूक पार पडणार आहेत. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील निवडणूक पार पडणार आहेत.