मुंबई, ११ मे, २०२४ प्रतिनिधी : मुंबई दक्षिणमध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी शनिवारी चेंबूरमधील रहिवाशांसह मॉर्निंग वॉक केले. या दरम्यान चेंबूरमधील रहिवाशांसोबत राहुल शेवाळे यांनी संवाद साधला. यावेळी चेंबूरच्या नारायण आचार्य उद्यानात मॉर्निंग वॉक करणाऱ्या रहिवाशांनी राहुल शेवाळे यांचे स्वागत केले. चेंबूरमधील रहिवाशांनी राहुल शेवाळेंना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.