अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक तापली; मातब्बर-अनुभवी चेहरे रिंगणात उतरल्याने निवडणुकीत चुरस वाढली

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मातब्बर आणि अनुभवी चेहरे रिंगणात उतरल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
amravati election
amravati election

सुरेंद्र अकोडे, प्रतिनिधी 

अमरावती : अमरावतीत शिक्षक मतदारसंघाची निवडणूक तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अपक्ष रिंगणात उतरलेले भाजप बंडखोर चंद्रशेखर भोयर ठरत चर्चेचे केंद्रबिंदू ठरत आहेत. भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले चंद्रशेखर भोयर यांच्या गुप्तगाठी भेटी यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसून शेखर भोयर यांच्या गुप्त बैठकी तसेच भाजपची स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबतची चर्चा हा या निवडणुकीतील कळीचा मुद्दा बनला आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत अपक्ष उमेदवार चंद्रशेखर भोयर यांनी शिक्षकांसोबत प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी आणि प्रश्न जाणून घेतले. भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केलेले चंद्रशेखर भोयर यांच्या या जनसंवादामुळे निवडणुकीची रंगत वाढली असून, आगामी काळात ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे बोलले जात आहे. मागील 18 वर्षांपासून शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे आणि संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून चंद्रशेखर भोयर यांच्याकडे पाहिले जाते. या निवडणुकीच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी आता अमरावती विभागातील शिक्षक वर्ग त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असून, यंदाच्या निवडणुकीत परिवर्तनाचा निर्धार शिक्षकांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या कार्यलयावर आधी ED चे छापे, आता तपास CBI च्या हाती; लाचखोरीप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल

हायव्होल्टेज शक्तिप्रदर्शन, शेवटच्या दिवशी 123 अर्ज दाखल

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय वातावरण चांगलेच तापले. प्रमुख दिग्गजांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत हजारो समर्थकांसह आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. ज्यामुळे संपूर्ण विभागात राजकीय धुरळा उडाला आहे. निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत अमरावती विभागात एकूण 123 अर्ज दाखल झाले आहेत. ज्यामुळे निवडणुकी तील रंगत वाढली आहे. शेवटच्या दिवशी प्रमुख उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासमोर मोठी गर्दी जमवत आपले राजकीय वजन सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. अनेक मातब्बर आणि अनुभवी चेहरे रिंगणात उतरल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांसोबतच अनेक अपक्ष उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल केल्याने मतविभाजनाची शक्यता वाढली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version