‘गोकुळ’ निवडणुकीसाठी महायुतीची अंतिम उमेदवार यादी जाहीर; अनेक दिग्गजांचा पत्ता कट, कोणाला मिळाली संधी?

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. मात्र, यादी जाहीर होताच महायुतीमध्ये अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे.

‘गोकुळ’ निवडणुकीसाठी महायुतीची अंतिम उमेदवार यादी जाहीर; अनेक दिग्गजांचा पत्ता कट, कोणाला मिळाली संधी?
Gokul Milk Union election

Gokul Milk Union Election: कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक शक्तिपीठ असलेल्या ‘गोकुळ’ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने अंतिम उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. मात्र, यादी जाहीर होताच महायुतीमध्ये अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. अनेक ज्येष्ठ संचालक आणि इच्छुकांचा पत्ता कट करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः गोकुळच्या राजकारणात दीर्घकाळ वर्चस्व गाजवणाऱ्या स्वर्गीय पी. एन. पाटील यांच्या गटाला या यादीत अवघी 1 जागा देण्यात आल्याने पाटील समर्थकांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे.

10 तालुक्यांतील नेत्यांचा यादीत समावेश

महायुतीने जाहीर केलेल्या यादीत चंदगड, करवीर, राधानगरी, पन्हाळा, कागल, शाहूवाडी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज आणि शिरोळ या 10 तालुक्यांतील प्रतिनिधींना स्थान दिले आहे. सर्वसाधारण गटातून राजेश पाटील, विश्वास पाटील-आबाजी, अरुण डोंगळे, राहुल पी. एन. पाटील, अजित नरके, संभाजी पाटील, विरेंद्र मंडलिक, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, युवराज पाटील, मदन देसाई, अंबरीषसिंह घाटगे, चेतन नरके, अशोक चराटी, रणजीत के. पी. पाटील, सतीश पाटील, रणजीत पाटील, दिपक पाटील आणि प्रतापसिंह पाटील यांचा समावेश आहे.

हेही वाचा –  महायुतीचा गोकुळ निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; राष्ट्रवादीला 9, तर भाजप-शिवसेनेला प्रत्येकी ‘इतक्या’ जागा

दरम्यान, आरक्षित जागांमध्ये अनुसूचित जाती-जमातीतून डॉ. सुजित मिणचेकर, भटक्या जमातीतून विश्वास जाधव, ओबीसी गटातून नावीद मुश्रीफ तर महिला राखीव गटातून शौमिका अमल महाडिक व अर्चना ए. वाय. पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सतेज पाटलांच्या ‘शाहू आघाडी’शी संपर्क वाढला

महायुतीकडून उमेदवारी नाकारण्यात आलेले अनेक दिग्गज आणि नाराज गट आता काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी’च्या संपर्कात आले आहेत. उमेदवारी न मिळालेले इच्छुक सतेज पाटलांच्या आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून, यामुळे गोकुळ निवडणुकीत मोठी बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीमधील या अंतर्गत फुटीमुळे निवडणुकीची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, आगामी काळात सतेज पाटील विरुद्ध महायुती असा अत्यंत ईर्ष्येचा आणि चुरशीचा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number