Thackeray Brothers Manifesto : घरांपासून आरोग्यापर्यंतचे 15 जबरदस्त घोषणा! नेमकं काय आहे ठाकरेंच्या वचनांमध्ये?

येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी एकत्र येत 'शब्द ठाकरेंचा' हा वचननामा रविवारी प्रसिद्ध केला.

Thackeray Brothers Manifesto : घरांपासून आरोग्यापर्यंतचे 15 जबरदस्त घोषणा! नेमकं काय आहे ठाकरेंच्या वचनांमध्ये?

Thackeray BMC Election Manifesto : येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी एकत्र येत 'शब्द ठाकरेंचा' हा वचननामा रविवारी प्रसिद्ध केला. मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर आणि शहराच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणाऱ्या अनेक मुद्द्यांचा यात समावेश आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणारा हा जाहीरनामा निवडणुकीत 'गेमचेंजर' ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खालीलप्रमाणे या वचननाम्यातील प्रमुख मुद्दे मांडले आहेत:
1. घरांचा आणि जमिनीचा प्रश्न मुंबईची जमीन ही केवळ मुंबईकरांच्या हक्काच्या घरांसाठीच वापरली जाईल, असा शब्द यात देण्यात आला आहे. महापालिकेच्या जमिनी बिल्डरांच्या घशात न घालता तिथे पोलीस, बेस्ट कर्मचारी आणि गिरणी कामगारांना घरे दिली जातील. आगामी 5 वर्षांत 1 लाख परवडणारी घरे बांधण्याचे उद्दिष्ट असून, पालिकेचे स्वतःचे 'गृहनिर्माण प्राधिकरण' स्थापन केले जाईल.
2. मुंबईकरांचा स्वाभिमान आणि सुविधा घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून त्यांना दरमहा 1,500 रुपयांचा 'स्वाभिमान निधी' दिला जाईल. कोळी महिला विक्रेत्यांना अर्थसाह्य आणि परवान्यांची सोय केली जाईल. कष्टकऱ्यांसाठी अवघ्या 10 रुपयांत जेवण देणारे 'मासाहेब किचन' सुरू होणार असून, महिलांसाठी दर 2 किलोमीटरवर सॅनिटरी नॅपकिन सुविधेसह हाय-टेक शौचालये उभारली जातील.
3. पाळणाघरे नोकरदार पालक आणि कष्टकरी महिलांच्या लहान मुलांची देखभाल करण्यासाठी विशेष पाळणाघरे सुरू करण्यात येतील.
4. पाळीव प्राण्यांसाठी सुविधा मुंबईच्या प्रत्येक विभागात पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र 'पेट पार्क', रुग्णवाहिका, क्लिनिक आणि स्मशानभूमीची सोय उपलब्ध करून दिली जाईल.
5. स्वयंरोजगार योजना 'वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयं-रोजगार योजना' राबवून 1 लाख तरुण-तरुणींना 25,000 ते 1 लाख रुपयांपर्यंतचा निधी दिला जाईल. तसेच 25,000 गिग वर्कर्स आणि डबेवाल्यांना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज दिले जाईल.
6. रोजगार आणि प्रशिक्षण महानगरपालिकेतील रिक्त पदे त्वरित भरली जातील. मराठी तरुण-तरुणींना कामाचा अनुभव मिळावा यासाठी 'ऑन-साइट' शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) आणि प्रत्येक वॉर्डात स्पर्धा परीक्षेसाठी 'सी. डी. देशमुख प्रशिक्षण केंद्र' सुरू केले जाईल.
7. मैदाने आणि ज्येष्ठ नागरिक शहरातील मैदाने भिंतींनी झाकली जाणार नाहीत आणि तिथे नागरिकांसाठी कट्टे असतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे आणि प्रत्येक वॉर्डात 'आजोबा-आजी' उद्यान उभारले जाईल.
8. कर सवलती आणि सोसायट्यांना अनुदान मालमत्ता कराची माफी आता 500 वरून 700 चौ. फुटांपर्यंतच्या घरांना लागू केली जाईल. पर्यावरणस्नेही उपक्रम राबवणाऱ्या सोसायट्यांना 1 लाख रुपयांची सबसिडी आणि मालमत्ता करात सवलत दिली जाईल. तसेच कचरा संकलनासाठीचा प्रस्तावित कर रद्द केला जाईल.
9. शैक्षणिक क्रांती पालिकेच्या शाळांमध्ये 12 वीपर्यंतचे ज्युनिअर कॉलेज सुरू केले जाईल. 8 वीनंतरच्या प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासासाठी टॅब दिला जाईल. एआय (AI) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मराठीसह एकूण 8 भाषांमध्ये मोफत आणि दर्जेदार शिक्षण देण्यावर भर असेल.
10. स्मशानभूमींचा विकास सर्व धर्मीयांच्या स्मशानभूमी आणि दफनभूमींचे आधुनिक पद्धतीने नूतनीकरण केले जाईल.

हेही वाचा – शिवसेना भवनात 'राज'दर्शन; 19 वर्षांनंतर ऐतिहासिक पुनरागमन आणि जुन्या संघर्षाच्या आठवणींना फुटला पाझर

11. मुंबईचा सांस्कृतिक वारसा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने देशातील सर्वात मोठे ग्रंथालय आणि मुंबईचा इतिहास सांगणारे अत्याधुनिक म्युझियम उभारले जाईल. तसेच स्व. बाळासाहेबांच्या नावाने कला महाविद्यालय आणि 2031 पर्यंत 10 नवीन नाट्यगृहे बांधली जातील.
12. आपत्कालीन यंत्रणा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे आधुनिकीकरण केले जाईल. झोपडपट्ट्या आणि उंच इमारतींसाठी प्रत्येक वॉर्डात मिनी फायर ब्रिगेड आणि अग्निशमन मोटारसायकल्स उपलब्ध केल्या जातील.
13. अत्याधुनिक आरोग्य सेवा मुंबईत आणखी 5 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि सुपर स्पेशालिटी कॅन्सर रुग्णालय सुरू केले जाईल. 'हेल्थ-टू-होम' सेवेद्वारे ज्येष्ठांना घरीच उपचार मिळतील. तसेच वाहतूककोंडीत वेगाने पोहोचणाऱ्या 'रॅपिड बाईक रुग्णवाहिका' सुरू केल्या जातील.
14. कचरा व्यवस्थापन पुढील 10 वर्षांत कांजूरमार्ग कचराभूमी बंद करून स्थानिक स्तरावर प्रक्रिया केंद्रे उभारली जातील. मानखुर्द डम्पिंग ग्राउंडच्या जागी आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान तयार केले जाईल.
15. रस्त्यांचा दर्जा मुंबईतील सर्व रस्ते पालिकेच्या अखत्यारीत आणून कंत्राटदाराकडून 15 वर्षांची हमी घेतली जाईल. खड्डे पडल्यास कंत्राटदाराकडून मोठा दंड वसूल केला जाईल.
16. पाणी आणि स्वच्छता समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्याचा प्रकल्प राबवून नालेसफाईची कामे वर्षभर केली जातील.
17. पाण्याचा हक्क टॉवर असो वा चाळ, प्रत्येक मुंबईकराला स्वच्छ आणि पुरेसे पाणी सध्याच्या दरातच देण्याची खात्री दिली आहे.
18. पदपथ आणि मोकळ्या जागा पादचाऱ्यांसाठी 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' धोरण राबवून पदपथ पेव्हर ब्लॉक मुक्त केले जातील. रेसकोर्स आणि आरेसारख्या मोकळ्या जागा बिल्डरांना दिल्या जाणार नाहीत.
19. पर्यावरण संरक्षण मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर अंमलबजावणी केली जाईल आणि कांदळवन व वृक्षसंपदेचे रक्षण केले जाईल.
20. 'बेस्ट' प्रवास बेस्टचे तिकीट दर 5 ते 20 रुपयांच्या फ्लॅट रेटमध्ये ठेवले जातील. ताफ्यात 10,000 नवीन इलेक्ट्रिक बसेस येतील आणि महिला-विद्यार्थ्यांना मोफत प्रवास दिला जाईल.
21. मोफत वीज बेस्टच्या विद्युत ग्राहकांना 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे.
22. पूर नियंत्रण मोगरा आणि माहुल येथे नवीन पंपिंग स्टेशन उभारून पर्जन्य जल व्यवस्थापन सक्षम केले जाईल.
23. मुंबईचा आर्थिक विकास बीपीटीच्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि वित्तीय केंद्र उभारले जाईल. मुंबईतून गेलेले आर्थिक केंद्र पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला जाईल आणि ऑलिम्पिक दर्जाची 'स्पोर्ट्स सिटी' उभारली जाईल.
24. पालिका व बेस्ट कर्मचाऱ्यांचे कल्याण सर्व कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाईल. बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यांना बोनस दिला जाईल आणि सफाई कामगारांना हक्काची घरे दिली जातील.
25. वाहतूक आणि पार्किंग शहरातील वाहतूककोंडीचे 200 स्पॉट्स निश्चित करून तिथे उपाययोजना केल्या जातील. पालिकेच्या वाहनतळांवर पार्किंग मोफत उपलब्ध असेल.

हेही वाचा – Chandrashekhar Bawankule On Raj-UddhavThackeray : "कितीही तोंडाच्या वाफा फेकल्या तरीही जनता…" ठाकरेंच्या जाहीरनाम्यावरून बावनकुळेंची राज-उद्धव ठाकरे दोघांवर जोरदार टीका

26. बाजार आणि मंडई म्युनिसिपल मार्केटचे आधुनिकीकरण केले जाईल आणि पारंपरिक मासळी बाजार मूळ ठिकाणीच जतन केले जातील.
27. युवा मुंबईकर प्रत्येक वॉर्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले जाईल. आयपीएल आणि संगीत मैफिलींची 1 टक्का तिकिटे 18 ते 21 वयोगटातील तरुणांना लॉटरीद्वारे मोफत दिली जातील.
28. डिजिटल प्रशासन मुंबईचे 'डिजिटल मॅपिंग' करून कारभार अधिक पारदर्शक आणि सोपा करण्यासाठी 'डिजिटल द्विन' (Digital Twin) प्रणाली वापरली जाईल.
29. कोळीवाडे आणि आदिवासी पाडे कोळीवाड्यांचे 'झोपडपट्टी' वर्गीकरण रद्द करून त्यांना जमिनीचे हक्क आणि स्वयंविकासाचा अधिकार दिला जाईल.
30. मुंबईचे स्वायत्त नियोजन मुंबईच्या शहर नियोजनाचे सर्व अधिकार केवळ महानगरपालिकेकडेच असावेत, यासाठी 'वन सिटी, वन रिस्पॉन्सिबिलिटी' धोरणाचा केंद्र व राज्याकडे पाठपुरावा केला जाईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number