Chandrashekhar Bawankule On Raj-UddhavThackeray : "कितीही तोंडाच्या वाफा फेकल्या तरीही जनता…" ठाकरेंच्या जाहीरनाम्यावरून बावनकुळेंची राज-उद्धव ठाकरे दोघांवर जोरदार टीका

जाहीरनाम्यादरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. याचपार्श्वभूमिवर नागपुरमध्ये बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. 

Chandrashekhar Bawankule On Raj-UddhavThackeray : &quotकितीही तोंडाच्या वाफा फेकल्या तरीही जनता…&quot ठाकरेंच्या जाहीरनाम्यावरून बावनकुळेंची राज-उद्धव ठाकरे दोघांवर जोरदार टीका

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या संयुक्त जाहीरनाम्याला आज दुपारी 1 वाजता सुरुवात झाली. त्यासाठी मनसे नेते राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनी शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. दरम्यान मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या संयुक्त जाहीरनाम्याचं मुंबईत प्रकाशन केलं. ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यात वीजबिल, बेस्ट बस दर, पाळणाघर, शासकीय महाविद्यालयाबाबत मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. युती नंतर उद्धव आणि राज मुंबईसाठीचा जाहीरनामा प्रकाशित करत आहे. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. याचपार्श्वभूमिवर नागपुरमध्ये बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. 

हेही वाचा- Raj – Udhhav Thackeray: “मोदींनी गंगा आणली, मिंधेंनी समुद्र बांधला” उद्धव – राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी कितीही जाहीरनामे घेतले आणि कितीही तोंडाच्या वाफा फेकल्या, कितीही टीका केल्या, जहरी टीका केल्या तरी आता जनता त्यांना विचारणार नाही. जनता त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. जनता त्यांना मतदान करणार नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विकसीत महाराष्ट्राला मतदान करतील. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला मतदान करतील. त्याचसोबत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतीस विकसीत महाराष्ट्र पाहण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना मतदान करतील. भाजपचा आरोपपत्र कधी काढायचा ते ठरवू. पण मुख्यत: जे आता भावनिक आव्हान केले जात. ही निवडणूक आता भावनिक राहणार नाही, ही निवडणूक विकासावर राहणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रत्येक भाषणात विकासावर भाष्य केलं आहे. कोणावरही कोणत्याही प्रकराची टीका-टिप्पणी केली नाही. आम्ही ठरवलं आहे, कुठल्याही पक्षावर कुठल्याही नेत्यावर टीका न करता, भाजप आणि आमचं सरकार काय करणार आहे, यावरचं आम्ही जास्त जोर देणार आहोत”. 

हेही वाचा- Uddhav Thacekray and Raj Thackeray Vachannama : ‘शब्द ठाकरेंचा’ हा वचननामा प्रकाशित, राज-उद्धव ठाकरे काय म्हणाले?

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभांच्या नियोजनाबद्दल माहिती देताना बावनकुळे म्हणाले की, “माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज विदर्भात रोडशो करत आहेत. अकोल्याला सभा होणार आहे. अमरावती आणि चंद्रपूर येथे रोडशो होणार आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्यात जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड याठिकाणी सभा घेतील. तसेच रोज संपुर्ण 29 महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठे ना कुठे जाण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान ते अनेक टॉक शो आणि डिजिटल मीडियासोबत प्रेसकॉन्सफरन्स घेतील. तसेच त्यांचे प्रबुद्ध लोकांसोबत संमेलन देखील होणार आहेत. त्यामुळे एकंदरीत मुख्यमंत्र्यांचा प्रचाराचा झंझावात महाराष्ट्रात महायुतीला जिंकवेल.”

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number