Raj – Udhhav Thackeray: "मोदींनी गंगा आणली, मिंधेंनी समुद्र बांधला" उद्धव – राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी

शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी 29 महापालिकांसाठी संयुक्त वचननामा जाहीर केला असून, या ऐतिहासिक एकजुटीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

Raj – Udhhav Thackeray: &quotमोदींनी गंगा आणली, मिंधेंनी समुद्र बांधला"  उद्धव – राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आज एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. निमित्त होतं मुंबईसह 29 महापालिका निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या 'संयुक्त वचननाम्या'चं. तब्बल 20 वर्षांनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दादरच्या शिवसेना भवनात पाऊल ठेवलं. शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) या तीन शक्तींनी एकत्र येत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी राज ठाकरेंनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक साद घातली, तर उद्धव ठाकरेंनी आपल्या खास शैलीत पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची तोफ डागली.

"20 वर्षांनी सुटून आल्यासारखं वाटतंय" – राज ठाकरे

शिवसेना भवनातील वातावरणाबद्दल बोलताना राज ठाकरे भावूक झाले होते. "मी 20 वर्षांनी शिवसेना भवनात आलो आहे, मला एखाद्या बंधनातून सुटून आल्यासारखं वाटतंय. हे नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच पाहतोय, माझ्या सर्व आठवणी तर जुन्या वास्तूशी जोडलेल्या आहेत. तिथे कुठे काय होतं हे मला तोंडपाठ होतं. जुन्या आठवणी रोमांचकारी आहेत, पण मी त्यात रमत नाही. आज आम्ही एक सक्षम पर्याय मुंबईकरांसमोर ठेवला आहे," असं राज ठाकरेंनी नमूद केलं. या ऐतिहासिक भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

हेही वाचा: Uddhav Thackeray: "धमकी देणाऱ्या नार्वेकरांना निलंबित करा " शिवसेना भवनातून उद्धव ठाकरेंची मागणी

"मोदींनी कैलास पर्वत बांधला, स्वर्गातून गंगा आणली!"

उद्धव ठाकरेंचा टोला व्यासपीठावरून बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार प्रहार केला. कोस्टल रोड आणि इतर विकासकामांच्या श्रेयावरून त्यांनी मोदी आणि शिंदेंची फिरकी घेतली. "आम्ही मुंबईसाठी कोस्टल रोड, मध्य वैतरणा किंवा कोरोना काळातील कामं केली, ही आमची साधी कामं आहेत. पण आमचं श्रेय घेण्यापेक्षा मोदींनी जे 'महान' काम केलंय ते त्यांनी का सांगू नये? मोदींनी कैलास पर्वत बांधला, स्वर्गातून गंगा आणली आणि मिंधे-फडणवीसांनी अरबी समुद्र तयार केला, याचं श्रेय त्यांनी घ्यावं," असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

श्रेयवादाच्या लढाईवरून 'शिंदे' सरकारवर निशाणा

रिगल सिनेमाजवळील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली. "त्या पुतळ्याची जागा मी निवडली होती, सर्व खर्च आम्ही केला, तरीही श्रेय 'मिंधे' घेत आहेत. समुद्रमंथन करून ते शिवस्मारक कधी आणणार? एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना कोणी ओळखत नव्हतं, तेव्हापासून आम्ही कोस्टल रोडचं प्लॅनिंग केलं आहे. आमच्या छोट्या कामांचं श्रेय चोरण्यापेक्षा स्वतःच्या 'महान' कामांचं मार्केटिंग करा," अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.

आदित्य आणि अमित ठाकरेंचे 'युवा' नेतृत्व 

या संयुक्त वचननाम्यात केवळ जुन्या नेत्यांचा अनुभव नाही, तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या तरुण नेतृत्वाचाही मोठा सहभाग आहे. वचननाम्यातील तांत्रिक बाबी आणि मुंबईच्या भविष्यासाठीचा रोडमॅप या दोन्ही युवा नेत्यांनी तयार केल्याचं राज ठाकरेंनी आवर्जून सांगितलं. मुंबईतील पायाभूत सुविधा, मराठी माणसाचा हक्क आणि पारदर्शक कारभार हे या वचननाम्याचे मुख्य आधारस्तंभ आहेत.

15 जानेवारीला 'कौल' अन् 16 ला जानेवारीला  'निकाल'

मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडलं असून, आता संपूर्ण राज्याचं लक्ष 16 जानेवारीच्या निकालाकडे लागलं आहे. ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने मतांच्या समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संयुक्त वचननाम्यामुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून, मुंबईच्या सत्तेची किल्ली कोणाकडे जाणार, याचा फैसला आता काही तासांवर येऊन ठेपला आहे.

हेही वाचा: Uddhav Thacekray and Raj Thackeray Vachannama : ‘शब्द ठाकरेंचा’ हा वचननामा प्रकाशित, राज-उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number