माळेगाव कारखान्याच्या वार्षिक सभेत मोठा राडा! सभासदांचा गोंधळ, वातावरण तापलं; अखेर सुनेत्रा पवार उठल्या माईक हातात घेतला अन्…

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे आज 71 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री तथा कारखान्याच्या चेअरमन सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असताना सभेत गोंधळ पाहायला मिळाला.

माळेगाव कारखान्याच्या वार्षिक सभेत मोठा राडा! सभासदांचा गोंधळ, वातावरण तापलं; अखेर सुनेत्रा पवार उठल्या माईक हातात घेतला अन्…
Baramati Malegaon Sugar Factory Sunetra Pawar

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची 71 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री पवार तथा चेअरमन सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाला आहे.

सभा संपन्न होण्यापूर्वी या सभासदांनी उसाचे चांगले उत्पन्न घेतले आहे त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या वार्षिक सर्वसाधारण सभेला मोठ्या संख्येने सभासद वर्ग उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे आज 71 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री तथा कारखान्याच्या चेअरमन सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असताना सभेत गोंधळ पाहायला मिळाला.

हेही वाचा- बारामतीत बँकेच्या वार्षिक सभेत सुनेत्रा पवार भावुक; अजितदादांच्या आठवणीने डोळे पाणावले, म्हणाल्या, ‘दादांची सर कोणालाच…’

साडेतीन तास सभासद कारखान्या संदर्भात आपले प्रश्न मांडत आहेत मात्र त्यांच्या प्रश्नाला कोणच उत्तर देत नसल्याने सभासदांनी गोंधळ घातला. प्रश्न मांडूनही उत्तर का दिल जात नाही असा सवाल करत सभासदांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आम्हाला प्रश्नांची उत्तरे तातडीने द्या, अशी आक्रमक भूमिका काही सभासदांनी घेतली.  या मागणीवरून सभासद आणि व्यवस्थापन यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली व काही काळ तणाव निर्माण झाला.

यावर व्हाईस चेअरमन यांनी सांगितले कारखान्याच्या चेअरमन सुनेत्रा पवार ह्या सर्व प्रश्नांची उत्तर देतील यानंतर सभासद शांत झाले. सभेचे कामकाज पुढे सुरू असताना विषयपत्रिकेचे वाचन करण्यात येत होते.  याच वेळी सभागृहात पुन्हा एकदा गोंधळ उडाला. काही सभासदांकडून आक्षेप घेतले जात असताना, दुसऱ्या बाजूने ‘विषय मंजूर, मंजूर’ अशा घोषणा देण्यात आल्या. या परस्परविरोधी घोषणाबाजीमुळे सभागृहातील वातावरण अधिकच तापले. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर सुनेत्रा पवार यांना स्वतः माईक हातात घेऊन सभासदांना शांततेचे आवाहन करावे लागले.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number