महायुतीत अंतर्गत वाद? महायुतीच्या बैठकीत विसंवाद; स्थानिक भाजप आमदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकीला दांडी

महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्या विजयाची रणनीती आखण्यासाठी अमरावतीत नुकतीच बैठक पार पडली.

महायुतीत अंतर्गत वाद? महायुतीच्या बैठकीत विसंवाद; स्थानिक भाजप आमदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकीला दांडी
amravati mahayuti meeting

सुरेंद्र अकोडे, प्रतिनिधी 

अमरावती : महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्या विजयाची रणनीती आखण्यासाठी अमरावतीच्या एका हॉटेलमध्ये नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सावंत, माजी आमदार तथा शिवसेना नेते अभिजीत अडसूळ, शिवसेना नेते आमदार बच्चू कडू आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक उपस्थित होते. या बैठकीकडे अमरावतीच्या स्थानिक भाजपच्या आमदारांनी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवत दांडी मारल्याचे दिसून आले. ज्यामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते संजय कुटे यांना पोहोचायला उशीर झाला होता.

हेही वाचा : अमित शाह यांच्या मतदारसंघातील निवडणुकीचे धक्कादायक निकाल; मतांच्या विभाजनामुळे…

दरम्यान, भाजपमध्ये मोठी चलबिचल सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. एका बाजूला महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्यासाठी बैठक सुरू असताना, दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये नेमके काय चालले आहे, याबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे यांनी पक्षाच्या विरोधात जात या निवडणुकीत बंडखोरी केली आहे, तसेच अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. संगीता शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात असल्याने आणि त्यांच्यामागे पक्षांतर्गत काही जणांची फळी असल्याची चर्चा असल्याने भाजपच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number