Shiv Sena UBT Matoshree Meeting : ‘मातोश्री’वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी! संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी घेतला समाचार

आज मातोश्रीवर झालेल्या ठाणे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाल्याची बातमी समोर आली आहे.

Shiv Sena UBT Matoshree Meeting : ‘मातोश्री’वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी! संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी घेतला समाचार

आज मातोश्रीवर झालेल्या ठाणे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाल्याची बातमी समोर आली आहे. आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली ठाणे जिल्ह्यातील कळवा भागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ठाणे जिल्ह्यामध्ये अधिक संघटना मजबूत करण्यासाठी यामध्ये पदांसंदर्भात मातोश्रीवरील बैठकीत चर्चा झाली.

ज्यामध्ये आधीचे पदाधिकारी आणि नव्याने नियुक्त करण्यासंदर्भात चर्चा झाली. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या समक्ष दोन गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे. दरम्यान दोन गटातली बाचाबाची पाहून उद्धव ठाकरेही संतापले. एक तरुण (अभिजीत दिपके) देशात आंदोलनातून मोदींना आव्हान देतो आणि तुम्ही इथे आपआपसात काय भांडताय? असं म्हणत उद्भव ठाकरेंनी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना झापले.

हेही वाचा- Rohit Pawar : चक्कर, ताप, अशक्तपणा अन्…, रोहित पवारांची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल

 त्यासोबत दोन दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदार संघातील शिवसेना ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. ही हकालपट्टी आज बैठकीत वादाचा विषय ठरली. या बैठकीला ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरूनाथ खोत, आमदार मिलिंद नार्वेकर, माजी आमदार विलास पोतनीस उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number