Abdul Sattar: अब्दुल सत्तार अन् एकनाथ शिंदे यांच्यात मध्यरात्री 3 तास खलबतं; बंडखोरी शमणार? सत्तारांचा मोठा खुलासा

शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून, या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Abdul Sattar: अब्दुल सत्तार अन् एकनाथ शिंदे यांच्यात मध्यरात्री 3 तास खलबतं; बंडखोरी शमणार? सत्तारांचा मोठा खुलासा

Abdul Sattar: शिवसेना पक्षांतर्गत आणि महायुतीमधील धुसफूस समोर आल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून, या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यासोबत रात्री तब्बल तीन तास सविस्तर बैठक झाली. यामध्ये आगामी रणनीतीबाबत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत,” अशी माहिती सत्तार यांनी दिली.

मध्यरात्री 3 तास बैठक; मुख्यमंत्र्यांकडून ‘कानउघाडणी’ आणि आदेश
अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, “रात्री तीन तास सन्माननीय पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे साहेब, सहा आमदार, एक खासदार, पालकमंत्री आणि दोन जिल्हाप्रमुख या सर्वांसोबत वन-टू-वन चर्चा झाली. शिंदे साहेबांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले आणि बैठकही घेतली. या बैठकीत पक्षाच्या बाबतीत सर्वांची कानउघाडणी देखील करण्यात आली. पक्ष अधिक मजबूत करून आपल्याला महायुतीसोबतच राहायचे आहे, असा कडक आदेश शिंदेंनी सर्वांना दिला आहे. त्यांच्या या आदेशानंतर आता प्रत्येक कार्यकर्ता आणि नेता महायुती धर्म पाळणार असून पुढची रणनीती ठरवली जात आहे.”

भाजपच्या स्थानिक नेत्यांवर ‘शिवसेना संपवण्याचा’ गंभीर आरोप
“विविध निवडणुकांमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद आणि आता विधानपरिषद अशा टप्प्याटप्प्याने आमच्या हातातील सत्ता कमी होऊ लागली आहे,” अशी खंत सत्तार यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर थेट निशाणा साधला. “जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे काही लोक नियोजनबद्ध रीतीने शिवसेना संपवण्याचा कट रचत आहेत. त्याला कुठेतरी वाचा फोडावी आणि हा डाव उधळून लावावा, यासाठीच मी ही सर्व माहिती शिंदे साहेबांच्या कानावर घातली आहे,” असा खळबळजनक आरोप सत्तार यांनी केला.

हेही वाचा – Manoj Jarange Patil: ‘लाडक्या दाजींकडून पैसे वसूल करू नका…’; मनोज जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी

दोन शिवसेना एकत्र येणार का? सत्तारांनी स्पष्ट केली भूमिका
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांवरही सत्तार यांनी उघडपणे भाष्य केले. ते म्हणाले, “विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोन शिवसेना एकत्र येण्याबाबतचा प्रस्ताव दोन वृत्तवाहिन्यांवर मांडला होता. त्यानंतर मला यावर विचारण्यात आले. मी त्यांना स्पष्ट सांगितले की, हा निर्णय घेण्याचा अधिकार माझ्यासारख्या कोणत्याही आमदाराला किंवा कार्यकर्त्याला नाही. हा सर्वस्वी अधिकार पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. तिकडच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे साहेब आहेत. हे दोन मोठे नेतेच यावर निर्णय घेऊ शकतात.”

एकनाथ शिंदे यांचा आदेश अंतिम; चर्चांना पूर्णविराम
केंद्रीय नेतृत्वाशी असलेल्या संबंधांवर बोलताना सत्तार म्हणाले, “आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, गृहमंत्री अमित शाह साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी अत्यंत चांगले संबंध आहेत. त्यामुळे या विषयावर बोलायचे की नाही, हा सर्व अधिकार त्यांचाच आहे. शेवटी एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात, तोच आमच्या पक्षात अंतिम आदेश असतो आणि त्याचे पालन सर्व शिवसेना कार्यकर्ते तंतोतंत करतील.” या बैठकीनंतर आता अब्दुल सत्तार यांची बंडखोरी शमणार असून ते महायुतीसोबतच ठाम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number