काँग्रेसची खेळी! भाजपचा उमेदवारच आपल्याकडे वळवला; अभिजीत वंजारींना तिकीट निश्चित, पत्रक जारी

विधान परिषदेच्या नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून अखेर उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेसची खेळी! भाजपचा उमेदवारच आपल्याकडे वळवला; अभिजीत वंजारींना तिकीट निश्चित, पत्रक जारी
abhijit vanjari

नागपूर : राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 6 ऑक्टोबर आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असतानाच काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुणे मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा : “मी निवडणूक आयोगाचा वकील नाही” ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावर बावनकुळेंची रोखठोक प्रतिक्रिया

अमरावती शिक्षक मतदार संघामधून अपेक्षेप्रमाणे आदिती पोहोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राज्यात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये आता काँग्रेसने आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number