क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कोट्यातून कोकाटे बंधूंनी चार सदनिका लाटल्या प्रकरणी अंजली दिघोळे राठोड यांनी अर्ज दाखल केला. याचपार्श्वभूमिवर न्यायमूर्ती रुपाली नरवडीया यांच्याकडे सुनावणीला सुरुवात केली असून थोड्याच वेळात मंत्री कोकाटे यांच्या अटकेबाबत निकाल येणार आहे. राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना सुनावण्यात सदनिक घोटाळाप्रकरणात सुनावण्यात आलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली आहे.
हेही वाचा- Pradnya Satav: हिंगोलीच्या राजकारणात खळबळ! काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवताना कोकाटे यांच्या अटकेचे निर्देश दिले आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे यांचं आज दिवसभरात अटक वॉरंट निघणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शासकीय कोट्यातील दहा टक्के सदनिका गैरव्यवहारप्रकरणी कोकाटे यांना दोन वर्ष आणि दहा हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवताना कोकाटे यांच्या अटकेचे निर्देश दिले आहे.
माणिकराव कोकाटेंच्या अटकेची कुणकुण लागताच उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखलं झाले असल्याची देखील माहिती समोर आली आहे. कॅबिनेट पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले. या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा निर्णय अजितदादांवरच सोडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या बैठकीत माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.