“शिक्षक संघटनाशी बोलून पुढील निर्णय घेणार” पुणे शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट; सानप यांचं ठरलं, महायुतीत मोठ्या घडामोडी

पुणे शिक्षक मतदारसंघावरून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये सुरु रस्सीखेच होती. मात्र पुण्यातील शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाटेला गेल्याने शिंदे गटात नाराजीचे सुर उमटताना दिसत आहेत.
Pune Teachers Constituency
Pune Teachers Constituency

आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या 2026 मधील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नागपूर विभागातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना तिकीट जाहीर झालंय. तसेच पुणे विभागातून कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना उमेदवारी मिळाली आहे. राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे वारे वाहत असताना पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने मोठी खेळी करत पुणे आणि नागपूरची जागा आपल्या कोट्यात घेतली.

मात्र जागावाटपाचा निर्णय आणि उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान इच्छुकांकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. पुणे शिक्षक मतदार संघाची जागा जरी महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आली असली तरी देखील पुणे शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार सचिन सानप यांनी आपण देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा- गोकुळ दूध संघ निवडणुकीबाबत मोठी अपडेट; जागावाटपावरून महायुतीत ठिणगी, ‘या’ नेत्याच्या नाराजीने फॉर्म्युला रखडला

यावेळी पुणे शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार सचिन सानप म्हणाले की, “भाजपने जो निर्णय घेतला आहे, त्यामध्ये भाजपला एकहि शिक्षक उमेदवार भेटला नाही का? संस्थाचालकांना उमेदवारी भाजपला द्यावी लागली. मी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या दुपारी एक वाजता मी शिक्षक मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.”

“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची माफी मागतो. शिक्षक संघटनाशी बोलून पुढील निर्णय घेणार आहे. उमेदवार कुणी का असेना मात्र शिक्षकाला उमेदवारी द्या. महायुतीच्या नेत्यांची भेट घेतली होती, माझ्या नावाला पसंती देखील मिळाली होती. योग्य शिक्षकाला मतदार निवडून देतील. भाजपला 58 तालुक्यात एकही शिक्षक उमेदवार मिळाला नाही.”

पुणे शिक्षक मतदारसंघावरून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये सुरु रस्सीखेच होती. मात्र पुण्यातील शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाटेला गेल्याने शिंदे गटात नाराजीचे सुर उमटताना दिसत आहेत. उमेदवारी मिळाली नाही तरी शिक्षक संघटनांच्या आग्रहानुसार निवडणूक लढण्याची भूमिका मंगेश चिवटे आणि सचिन सानप यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा तिढा कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version