Friday, November 07, 2025 09:13:26 AM

Anandacha Shidha Scheme: शिवभोजनानंतर 'आनंदाचा शिधा'ही बंद? महायुतीच्या योजनांना लागतोय ब्रेक

महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणात योजनांची घोषणा केली होती. त्यात एक होती ‘आनंदाचा शिधा योजना’.

 anandacha shidha scheme शिवभोजनानंतर आनंदाचा शिधाही बंद महायुतीच्या योजनांना लागतोय ब्रेक

Anandacha Shidha Scheme: महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणात योजनांची घोषणा केली होती. त्यात एक होती ‘आनंदाचा शिधा योजना’. दिवाळी आणि इतर सणांच्या सुमारास गरीब कुटुंबांना सणाच्या आनंदाचा अनुभव पुरेपूर अनुभव घेता यावा म्हणून या योजनेची सुरूवात केली गेली होती. मात्र, राज्यातील वाढते आर्थिक संकट आणि प्रलंबित निधीच्या प्रश्नामुळे यंदा ‘आनंदाचा शिधा’ योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे का, असा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

‘आनंदाचा शिधा’ योजना 2023 साली सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना फक्त 100 रुपयांमध्ये एक किलो चणा डाळ, साखर, आणि एक लिटर खाद्यतेल दिले जात होते. त्यामुळे किमान दिवाळीच्या काळात गोडधोड करण्याची सोय सामान्य नागरिकांची होऊ शकली. या योजनेचा लाभ एक कोटी 72 लाख शिधापत्रिकाधारकांनी घेतला होता. विशेष म्हणजे, यामध्ये पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना वगळून प्रत्येक पात्र व्यक्तीला याचा लाभ मिळत होता.

हेही वाचा: Pandharpur Kartiki Ekadashi 2025: दोन उपमुख्यमंत्री असताना विठ्ठलाची पूजा कोण करणार?; मंदिर समिती संभ्रमात

परंतु, यंदा दिवाळी जवळ येऊन ठेपली असताना या योजनेची घोषणा करण्यात आलेली नाही. याच्यामुळे अनेक लोकांमध्ये या योजनेच्या भवितव्याबद्दल शंका निर्माण झाली आहे. मराठवाडा आणि सोलापूरसारख्या पाण्याच्या तुटवड्याने ग्रस्त असलेल्या भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. शेती आणि घरांचे नुकसान झाल्यामुळे त्या भागातील लोकांना दिलासा देण्याच्या हेतूने ‘आनंदाचा शिधा’ योजना त्यांना वितरित केली जावी अशी अपेक्षा आहे. परंतु, सरकारकडून कोणत्याही ठोस उल्लेख झालेला नाही.

महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कामगिरीनंतर, ही योजना पुन्हा सुरू होणार का, असा सवाल उपस्थित होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, कोणतीही योजना बंद झालेली नाही. तरीही, प्रत्यक्षात कृषी, समाजकल्याण आणि गरीब कल्याणाशी संबंधित अनेक योजनांमध्ये निधीचा तुटवडा असल्याचे दिसून येत आहे. याचाच अर्थ असा की, इतर योजनांप्रमाणे ‘आनंदाचा शिधा’ योजनाही संकटात असू शकते.

हेही वाचा: Coldrif Cough Syrup Ban: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोल्ड्रिफ कफ सिरपच्या विक्री आणि वापरावर तात्काळ बंदी

योजना बंद होण्यामागे मुख्य कारण म्हणजे राज्याच्या तिजोरीतील खडखडाट. सरकारी तिजोरीतील कमी निधीमुळे विविध योजना सुरू ठेवणं सरकारला कठीण होऊन बसलं आहे. 'शिवभोजन थाळी', 'लाडकी बहीण योजना' यासारख्या अन्य योजनांमध्ये देखील निधीचा अभाव दिसून येत आहे.

त्यामुळे, या योजनेला चालना देण्यासाठी सरकारकडून काही ठोस निर्णय घेतले जातात की नाही, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. राज्य सरकारने याबाबत अधिकृतपणे घोषणा न केल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ आहे.

आनंदाचा शिधा योजना महाराष्ट्रातील गरीब आणि सामान्य जनतेसाठी एक महत्त्वाची योजना आहे , ज्यामुळे सणाच्या वेळेस त्यांना काही गरजेच्या वस्तूंची प्राप्ती होते. परंतु, राज्य सरकारच्या आर्थिक संकटामुळे या योजनेचं भवितव्य धूसर दिसत आहे. सरकार या योजनेबाबतकाय निर्णय घेणार, यावर देशभर चर्चा चालू आहे.


सम्बन्धित सामग्री