पुणे: सध्या, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. मात्र, निवडणुका तोंडावर असतानाच नागालँड येथील 7 आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष सोडल्याची बातमी समोर आली आहे. अशातच, आता पुण्यातील 1 नाही, 2 नाही तर तब्बल 100 मनसे कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना जबरदस्त धक्का बसला आहे.
हेही वाचा: नागालँडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी सोडली साथ
माहितीनुसार, रविवारी पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या 100 कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश सोहळा पुण्यातील मोदीबाग येथील शरद पवार यांच्या कार्यालयात पार पडला. विशेषतः यावेळी शरद पवारही उपस्थित होते. पुण्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याचं कारण म्हणजे पुणे शहरात मनसे पक्षाचा एकही आमदार नाही. नुकताच काही महिन्यांपूर्वी वसंत मोरे यांनी देखील मनसेची साथ सोडली होती. अशातच आता 100 कार्यकर्त्यांनीही मनसेला रामराम केला आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत नगरसेवक निवडून आणण्याचे आव्हान मनसेसमोर असेल.
हेही वाचा: विपश्यना केंद्रातील साधना पूर्ण करून धनंजय मुंडे बीडकडे रवाना