मोठी बातमी! जंतर मंतरवर नेमकं काय घडलं? सौरव दास, आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली, CJP चे अजिंक्य शिंदे यांच्याकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मोठी बातमी! जंतर मंतरवर नेमकं काय घडलं? सौरव दास, आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली, CJP चे अजिंक्य शिंदे यांच्याकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे. आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना काल अटक करण्यात आली होती.

केंद्रीय निवडणूक आयोगाची कार्यप्रणाली चुकीची असून त्यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ केल्याचा आरोप करत CJP आणि इंडिया आघाडीकडून देशभरात आंदोलन सुरू आहे. हा आरोप थेट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरीही आशुतोष रांका आणि सौरभ दास हे जंतर-मंतर येथे पोहोचताच त्यांना अटक करण्यात आली.

 

काय म्हणाले अजिंक्य शिंदे?

“हे मोदी सरकार हुकूमशाही सरकार आहे” – अजिंक्य शिंदे यांचा घणाघात

मोदी सरकारवर जोरदार टीका करताना CJP चे अजिंक्य शिंदे म्हणाले, “आज आशुतोष रांकाच्या वाढदिवसानिमित्त मी, आशुतोष रांका, सौरभ दास आणि इतर नेत्यांनी जंतर-मंतरवर जाऊन तिरंगा फडकावला आणि ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा दिली. एवढ्या कारणावरून दिल्ली पोलिसांनी आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना अटक करण्यात आली.”

“या सरकारने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत देशातील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांनाच ठेच पोहोचवली आहे,” असा आरोपही त्यांनी केला.

‘हे सरकार ब्रिटिशांसारखे वागत आहे’

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, “जसे इंग्रज राजवटीत क्रांतिकारकांनी भारताचा झेंडा फडकावला की त्यांना तुरुंगात टाकले जायचे, अगदी तसेच हे मोदी सरकार आमच्यासोबत वागत आहे. हे सरकार इंग्रजांसारखेच आहे.”

यापूर्वीही CJP आणि इंडिया आघाडीने दिल्लीत अनेकदा आंदोलने केली आहेत. जंतर-मंतरवर झालेल्या CJP च्या आंदोलनादरम्यान अभिजित दिपके याला विमानतळावर जाण्यापूर्वीच आणि आशुतोष रांका व सौरभ दास यांना आंदोलनस्थळी अटक करण्यात आली होती. तेव्हा त्यांना दुसऱ्या दिवशी सोडण्यात आले होते, मात्र काल पुन्हा त्यांना अटक करण्यात आली.

या प्रकरणामुळे अभिजित दिपके आणि CJP आंदोलकांमध्ये खळबळ उडाली आहे. यावर CJP कडून काय प्रतिक्रिया येणार आणि पुढे या आंदोलनाला काय वळण मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version