दसऱ्यानिमित्त गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पुढील वेळीही ते मुख्यमंत्री होतील, असा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
हेही वाचा- ‘एकनाथ शिंदेंना उद्ध्वस्त करायला निघालात तर…’, रामदास कदमांचा जरांगेंना थेट इशारा
“ज्याप्रमाणे राम सेतू तयार झाला त्याप्रमाणे आमच्या नेत्याने लोकांना जोडलं. भगवा आमच्या खांद्यावर आणि शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बांधावर हे वाक्य फार आवडलं. दुसरीकडे बांगलादेशींची बाजू घेणारे आणि 500 कोटी घेतले असे खोटे आरोप ही लोकं करतात. माझी सर्व आमदार आणि खासदारांना विनंती करतो, की 50 % पैसे जलसंधारणाचे खर्च केले पाहिजेत.”
“आमच्या मतदार संघातील नाले आम्ही खोल करू. जी लोकं आपल्या पक्षाला बुडवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना सांगतो आमचे शिंदे साहेब हे देणारे आहेत घेणारे नाहीत. आई देवीच्या चरणी माझं मागणं आहे की आमच्या शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री व्हावं आणि शेतकरी सुखी व्हावे. मी पुढच्यावेळी इथे भाषण करायला येईल त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील. एकनाथ शिंदे साहेबांना जो आडवा येईल, त्याचा सत्यानाश होवो.”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.