बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीडच्या दादाहरी वडगाव येथील रहिवासी आणि शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Manoj Jarange : कोणाला सुगावा न लागू देता जरांगेंच्या उपोषणाचा मंडप हटवला,अंतरवालीत नेमकं काय घडलं?
शिवाजीराव शिंदे यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर दुपारी अकरा वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून आत्महत्येचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
चार महिन्यापूर्वी मे 2026 मध्ये परळी शहरात त्यांच्या मालकीच्या हॉटेलमध्ये एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला होता. ज्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचार घेऊन पूर्णपणे बरे होऊन घरी आल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली आहे. शिंदे यांनी अशाप्रकारे आपल्या आयुष्याचा शेवट केल्याने बीडसह महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिंदे यांनी हे टोकाचे पाऊल का उचललं? यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.