Thursday, November 13, 2025 01:36:57 PM

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी माहिती समोर, 'या' तारखेला होणार निवडणुका

राज्यातील जनतेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

local body election स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी माहिती समोर या तारखेला होणार निवडणुका

मुंबई: राज्यातील जनतेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. 31 जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडाव्यात असे निर्देश न्यायालयाने निवडणुक आयोगाला दिले आहेत. परंतु अजूनही निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. अशातच आता पुढील काही दिवसांमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

गेल्या काही काळापासून महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. पण आता न्यायालयाच्या आदेशानंतर या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. 5 किंवा 6 तारखेला वेळापत्रक जाहीर होऊ शकतं. यानंतर लगेच आचारसंहिता लागणार आहे. तसेच निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत आणि मतदानानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा : Sharad Pawar On Satyacha Morcha : 'मला जुन्या गोष्टींची...', 'सत्याचा मोर्चा' दरम्याने शरद पवारांनी सांगितला 'तो' प्रसंग

पहिल्या टप्प्यात नगरपालिका, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. मात्र या निवडणुकींच्या तारखा कधी जाहीर केल्या जातील याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिलीप वळसे पाटलांनी सांगितली तारीख
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहे. या तारखा जाहीर करताना त्यांनी कार्यकर्त्यांना लवकर कामाला लागा अशा सूचना सुद्धा दिल्या आहेत. मंचर येथील युवक-युवती मेळाव्याला संबोधित करताना दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले की, "मी तारीख जाहीर करत नाही, तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. मात्र आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार 5 नोव्हेंबरला नगरपालिका, नगरपंचायत निवडणूका जाहीर होतील तर 15 डिसेंबरला जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदान होईल. जिल्हा परिषदेच्या निवडणूका सुरु असताना महानगरपालिकांच्या निवडणूका जाहीर होऊन 15 जानेवारीला मतदान होईल आणि 31 जानेवारीला सर्व निवडणुका पूर्ण होतील." 


सम्बन्धित सामग्री