Thursday, November 13, 2025 02:46:50 PM

Sharad Pawar On Satyacha Morcha : 'मला जुन्या गोष्टींची...', 'सत्याचा मोर्चा' दरम्याने शरद पवारांनी सांगितला 'तो' प्रसंग

शरद पवार यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.

sharad pawar on satyacha morcha  मला जुन्या गोष्टींची सत्याचा मोर्चा दरम्याने शरद पवारांनी सांगितला तो प्रसंग

आज मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली 'सत्याचा मोर्चा' पार पडला. यावेळी विरोधकांवर मतचोरीचे आरोप करण्यात आले.  या मोर्चाला राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.  शरद पवार यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. 

हेही वाचा - Thackeray Brothers In Satyacha Morcha : 'सत्याचा मोर्चा'त ठाकरे बंधू खुर्ची सोडून थेट स्टेजवर खाली बसले, 

यावेळी शरद पवार म्हणाले की, "आजच्या मोर्चामुळे मला जुन्या गोष्टींची आठवण आली.1978-79  च्या काळात महाविद्यालयात शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात असाच मोर्चा निघाला होता. काळा घोडा आणि त्याचा परिसर तिथे मोर्चे एक प्रकारचा विचार समन्वय दाखवणारे मोर्चे होते. आज महत्त्वाचा विषय आपण हातात घेतला. आपण स्वतसाठी काही मागत नाही. आपण एवढंच म्हणतोय की लोकशाहीत संविधानाने तुम्हा आम्हाला अधिकार दिला त्याची जतन करणं याची वेळ आली आहे". 


सम्बन्धित सामग्री