राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी जळगावात मोठा दावा केला आहे. चाळीसगाव तालुक्यातील दुष्काळ आणि पाणी परिस्थितीच्या पाहणी दौऱ्यावर असताना त्यांनी हा दावा केला. अजित पवारांच्या अपघातामागे घातपाताची शक्यता असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवणाऱ्या एका मोठ्या नेत्याची पोलखोल करणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच ही व्यक्ती राज्यातीलच असल्याचा मोठा गौप्यस्फोटदेखील त्यांनी केला आहे.
‘अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात दोषी व्यक्तीचे नाव, फोटो आणि संबंधित पुरावे लवकरच समोर आणणार,’ असे रोहित पवार यांनी वक्तव्य केले. हा खुलासा रोहित पवार 10 ऑक्टोबरनंतर जाहीर करणार आहेत. असे देखील म्हटले आहे. यादरम्यान ते दुष्काळ, पाणी परिस्थितीच्या पाहणी दौऱ्यावर होते, मात्र काही जिल्ह्यांचा दौरा अद्याप बाकी असून, तो पूर्ण केल्यानंतर नाशिक किंवा मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.