“तर मी त्यांच्या विरुद्ध केस करणार” पुर्णेकर प्रकरणात आरोप होताच माजी महापौर मिनाक्षी शिंदेंचा थेट इशारा; नेमकं काय म्हणाल्या?

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणी मिनाक्षी शिंदे यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहे. तसेच आदित्य ठाकरे या घटनेचे राजकारण करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

“तर मी त्यांच्या विरुद्ध केस करणार” पुर्णेकर प्रकरणात आरोप होताच माजी महापौर मिनाक्षी शिंदेंचा थेट इशारा; नेमकं काय म्हणाल्या?
Meenakshi Shinde On Pradeep Purnekar death

ठाण्याच्या मानपाडा परिसरातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी 29 सप्टेंबरला रात्री साधारण साडेनऊच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ठाण्यातील शिवसेना ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख पुर्णेकर यांच्या झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ठाण्यात पोहोचले असून पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या सगळ्या घटनेमुळे सध्या ठाण्यात प्रचंड तणावाचे वातावरण आहे.

या हत्येमागे राजकीय संघर्ष असून शिंदे सेनेच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे हे दोघे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणारे सूत्रधार असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबाने केला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्यावर पूर्णेकर कुटुंब सातत्याने आरोप करत आहे. त्यानुसार मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पूर्णेकर कुटुंबाने केली आहे.

हेही वाचा- मोठी बातमी! आदित्य ठाकरे आणि संजय राऊत पुर्णेकर कुटुंबियांच्या भेटीला; ठाण्यात तणावपूर्ण वातावरण

दरम्यान मिनाक्षी शिंदे यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहे. तसेच आदित्य ठाकरे या घटनेचे राजकारण करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. यावेळी मिनाक्षी शिंदे म्हणाल्या की, “आमच्या वार्डात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, पण मी आज पाहिलं कशा प्रकारे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत त्याचं राजकारण करत आहेत. हे लोक स्वतःची राजकीय पोळी शेकण्याचं काम करत आहेत. मला वाटतं पोलीस या प्रकरणावर त्यांच काम करत आहेत. निवडणुकीत हार पत्कारल्यानंतर प्रभागात काहीही झालं तरी ते माझंच नाव घेत आहेत.”

“गेले 20 वर्ष मी राजकारणात आहे माझे वैचारिक मतभेद जरी कोणाशी असले तरी मला जे ओळखतात त्यांना माहित आहे की, अशा प्रकारे कोणाला जीवे मारण्याचा प्रयत्न मी केला नाही आणि कधी करणारही नाही. मला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्या विरुद्ध मी केस करणार. पुर्णेकरांचा सोशल मीडिया अकाऊंट पाहिला तर तुम्हाला कळेल की ते किती लोकांना मारत होते.लाईव्ह येऊन लोकांना रस्त्यावर मारत होते. कोणाच्या तरी विरुद्ध तक्रार करत होते. आता हे मी सांगू शकत नाही की त्यांच्यातलं कोणी काय केलं आहे का? हे पोलीस चौकशी करतील त्याच्यामध्ये उघडं होईल.” असा ठाम विश्वास माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number