जंतर-मंतर आंदोलनाआधीच ध्रुव राठीला उचललं?, गुरुग्राममधून ताब्यात घेतल्याचा दावा

CJP Protest Update : प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी यांच्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. CJP कडून करण्यात आलेल्या दाव्यामुळे चर्चेला उधाण आले असून, दिल्लीतील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेमकं प्रकरण काय आणि या दाव्यामागे काय घडलं, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

जंतर-मंतर आंदोलनाआधीच ध्रुव राठीला उचललं?, गुरुग्राममधून ताब्यात घेतल्याचा दावा
Is YouTuber Dhruv Rathee Under Arrest?

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन पुकारले आहे. यात आंदोलनासाठी प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी भारतात आला होता.

दरम्यान, सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. सीजेपीनं सोशल मीडियावर दावा केला आहे की, ध्रुव राठी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुग्राम येथील घरातून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सीजेपीने म्हटले आहे. सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच ही कारवाई केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्याला अजूनही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. दिल्ली पोलिसांकडूनही याबाबत कोणतेबही स्पष्टीकरण आलेले नाही.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number