नवी दिल्ली : विरोधक देशातील नागरिकांची जातनिहाय गणना करण्याची मागणी करत आहेत. तर मोदी सरकारचे समर्थक आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देशातील नागरिकांची कौशल्यांच्या आधारे गणना करण्याची मागणी केली आहे. या गणनेची मागणी लवकरच पंकप्रधान मोदींच्या पुढे मांडणार असल्याचे चंद्राबाबू नायडू म्हणाले. देशातील किती नागरिकांकडे कोणते कौशल्य आहे हे लक्षात आले की सरकारी योजनांचे नियोजन करणे जास्त सोपे होईल, असे चंद्राबाबूंचे म्हणणे आहे.