Tuesday, December 10, 2024 02:13:21 AM

MVA
महाविकास आघाडीत बिघाडी ?

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. महायुतीतील भाजपाने पहिल्या यादीतून ९९ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पण मविआकडून अद्याप एकही यादी जाहीर झालेली नाही.

महाविकास आघाडीत बिघाडी

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. महायुतीतील भाजपाने पहिल्या यादीतून ९९ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पण मविआकडून अद्याप एकही यादी जाहीर झालेली नाही. शिउबाठाचे जागावाटपावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी मतभेद सुरू असल्यामुळे मविआची यादी जाहीर होण्यास वेळ लागत असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर मविआ फूट पडलेली नाही... मविआ एकोप्याने लढेल असा दावा शिउबाठाच्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. संजय राऊतांनीही चर्चा सुरू आहे आणि तिढा लवकरच सुटेल असा विश्वास व्यक्त केला आहे. 

                       

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo