MPSC आंदोलनाच्या नावाखाली मद्यपान, छेडछाड आणि धांगडधिंगा; नवनाथ बन यांच्याकडून व्हिडीओ दाखवत पर्दाफाश

पुण्यामध्ये आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत लाव रे व्हिडिओ दाखवला.
Navnath Ban On Rohit Pawar
Navnath Ban On Rohit Pawar

पुण्यामध्ये आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत लाव रे व्हिडिओ दाखवला. त्यांनी एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली धांगडधिंग्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप केला आहे. रोहित पवारांच्या आंदोलनात नाईट लाईफ सुरू असल्याचा आरोप देखील नवनाथ बन यांनी केला. आंदोलनात मध्यरात्री केल्या जाणाऱ्या धांगडधिंग्याचा व्हिडीओ भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दाखवला असून त्याचा पुरावाच आमच्या हाती लागला आहे असे स्पष्ट म्हटले आहे. त्याचसोबत एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात विद्यार्थी नसून रोहित पवारांचे कार्यकर्ते असल्याचा आरोपही बन यांनी केला.

यावेळी नवनाथ बन म्हणाले “या व्हिडिओ मध्ये युवक काँग्रेसचा शिवराज मोरे आहे. 3 व 4 ऑक्टोबरला रात्री दीड वाजेपर्यंत एमपीएससी आंदोलनात होता. तिथून कोरेगाव पार्क येथे गेला. तारिक बागवान व एका कार्यकर्त्या सोबत ड्रिंक करून रस्त्यावर गुंडगिरी केली. मुलीला छेडण्याच्या प्रकरणात वाद झाला. मुलीच्या मित्राने विरोध केला. तर भांडण झाल्याचा व्हिडिओ आहे. हे मध्यरात्रीचा प्रकार आहे. हीच तुमची नाईट लाईफ आहे. हा विद्यार्थी आहे का? हा कुणासोबत वाद घालतोय, भांडणाचे कारण काय. हे विद्यार्थी नाहीत हे पहिल्यापासून बोलतोय. विद्यार्थी रात्री घरी गेल्यावर अभ्यास करत असते. हे अभ्यास करत आहेत का? रात्री कुणाची छेडछाड करत आहेत याचे उत्तर रोहित पवारांनी द्यावे. विद्यार्थ्यांच्या नावावर रोहित पवार हे गुंडगिरी व धांगडधिंगा करत आहेत. त्याचा हा पुरावा आहे. शिवराज मोरेला कराडच्या निवडणुकीत जनतेने नगरसेवक होऊ दिले नाही. मुलींच्या प्रकरणावर धांगडधिंगा घालणारे हेच ते तुमचे विद्यार्थी आहेत का? याचे उत्तर रोहित पवारांनी द्यावे.”

हेही वाचा- ‘धनुष्यबाण पुन्हा योग्य हातातच येणार…’; सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

“शिवराज मोरे नो बॉलवर खेळण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांची हिट विकेट पडली आहे. प्रेमभंग कुणाचा झालाय ते त्यांनी सांगावं. रोहित पवारांनी कधी एमपीएससी फॉर्म फॉर्म नाही. त्यांचे आजोबा मुख्यमंत्री होते,त्यांना वारशात आमदारकी मिळाली आहे. अन्यथा त्यांना लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत देखील निवडून दिलं नसतं. हे गुंड रोहित पवारांचे आहेत. महिलांची छेड काढणाऱ्यांना हाताशी धरून आंदोलन केले जातंय. कोर्टाने देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन न करता अभ्यास करावा, रोहित पवारांच्या नादी लागू नये असं कोर्टाने म्हटलंय. मारहाण केलेल्या व्यक्तीकडे ड्रग्ज असल्याचं मोरे म्हणतात, तुम्हाला कारवाई करण्याचे अधिकार कुणी दिले,तुम्ही पोलिस आहात का? 3 तारखेपासून आजपर्यंत तुम्ही काय करत होतात. दृश्यम चित्रपट सारखं कितीही गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करा तरी खरं समोर येईल.”

“मी धमक्यांना घाबरत नाही. त्यांनी माझ्या विरोधात शंभर कोटींचा दावा करावा. नवनाथ बनला धमक्या द्यायच्या आहेत तर द्या,मी भीक घालत नाही. सत्य उजागर केल्याशिवाय राहणार नाही. रोहित पवारांचे कार्यकर्ते ट्रोल करतात पण मी त्याला भीक घालत नाही.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version