CM Devendra Fadanvis : शेतकऱ्यांना दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अखेर राज्यतील इतक्या तालुक्यात दुष्काळ जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून ट्रिगर 1 लागू झालेल्या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.
CM Devendra Fadanvis
CM Devendra Fadanvis

राज्यभरात लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला असतानाच दुष्काळाची भीषण परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील ट्रिगर 1 लागू झालेल्या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ, याचा अर्थ 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर केला असून दुष्काळाच्या विविध उपाययोजना जाहीर होणार आहेत.

महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर झाल्याने आता दुष्काळाच्या विविध उपाययोजना जाहीर होऊन त्यांची अंमलबजावणी केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करत दुष्काळ निवारणासाठी विविध सवलती आणि उपाययोजना जाहीर केल्या आहे. या निर्णयामुळे दुष्काळाची दाहकता अनुभवत असलेल्या शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पालकमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जात होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक दिवस दुष्काळी दौरा केला होता. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा- Maharashtra Drought Declaration: राज्यात 75 टक्के कोरडा दुष्काळ जाहीर; 256 तालुक्यांतील शेतकऱ्यांना वीजबिल सूट अन् शैक्षणिक फी माफीचा मोठा दिलासा

दुष्काळाच्या विविध उपाययोजना
जमीन महसुलात सूट
पीक कर्जाचे पुनर्गठन
शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती
कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट
(7.5 हॉर्सपॉवर क्षमतेच्या वीजपंपांचे वीज बिल आधीच माफ, आता त्यावरील वीजपंपांनाही सूट)
शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देणार असून रोजगार हमी योजना अंतर्गत नियमात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरु करणार. तसेच आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे टँकर्स, तर टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्‍यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित होणार नाही.

शेतीवर आश्रित शेतकरी/शेतमजूर यांना अन्नधान्य पुरवणार, जनावरांच्या चार्‍याची व्यवस्था करणार, जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेणार. त्याचसोबत पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी यासाठी आधीच्या आदेशाप्रमाणे नियोजन सुरुच ठेवणार. पंचनाम्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे सर्व जिल्हाधिकार्‍यांना आदेश देण्यात आले असून पिकांची स्थिती दाखवणारे छायाचित्र, जीपीएस संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version