मुंबई: 'विजयी सोहळा हा सोहळा नव्हता तर रडगाणं होतं', ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं. 'आमचं हिंदुत्त्व सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे. आमच्या हिंदुत्त्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे', असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.
हेही वाचा: सुप्रिया सुळेंनी आणलं आदित्य-अमितला एकत्र
काय म्हणाले फडणवीस?
मी राज ठाकरेंचे आभा मानतो. कारण त्यांनी याठिकाणी दोन बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील. पण मला असं सांगण्यात आलं होतं की हे विजयी मेळावा होणार आहे. पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं. मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीचा विजयोत्सव नव्हता, हे रुदाली होती', अशी टीका फडणवीसांनी केली.