निवडणूक आयोगाच्या कारभारावरून राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि त्यांचे सहकारी आयुक्त सुखबीरसिंग संधू व विवेक जोशी यांच्यातील अंतर्गत मतभेदांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. नवीन मतदारांची नोंदणी, मतदार यादीतून नावे वगळणे आणि ती पुन्हा समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेवर तसेच SIR मुद्द्यावरून फॉर्म-6 मधील सुधारणांवर विरोध दर्शवण्यात आला आहे.
यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रिये वरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याची केस ज्ञानेश कुमार यांनी इतर दोन निवडणूक आयुक्तांची सहमती नसताना काही निर्णय घेतले असा आरोप करण्यात आला आहे. गेल्या दहा महिन्यांत दोन्ही आयुक्तांनी ज्ञानेश कुमार यांच्या काही निर्णयांवर तब्बल 14 वेळा लेखी आक्षेप नोंदवले असल्याचे वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
निवडणूक आयोगाने सगळे निर्णय सहमतीने एकजुटीने घेतले असल्याचे सांगितले. आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR चा मुद्द्यावरून राजकीय वाद सुरू आहे. अशातच कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) अध्यक्ष आणि संस्थापक अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. पुढील 48 तासांत राजीनामा न दिल्यास देशभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान आता ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्याच्या मागण्याच्या मुद्द्यावरून केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी कॉक्रोज जनता पार्टीवर टिका केली आहे. राजिनामा मागण्यासाठी कॉक्रोज जनता पार्टी आहे का असा सवाल करीत त्यांनी आपल नाव बदलून राजीनामा जनता पार्टी कराव असा खोचक टिका केंद्रिय मत्री रामदास आठवले यांनी कॉक्रोज जनता पार्टीवर केली आहे. याच वेळी आठवले यांनी ज्ञानेश कुमार यांची पाठराखण करीत ज्ञानेश कुमार यांनी कोणाच्याही दबावाखाली राजिनामा देऊ नेये अस सुचना करणार आपल मत आठवले यांनी व्यक्त केल आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.