बुलढाणा : राहुल गांधींच्या एका फोन कॉलनंतर माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी आपला भाजप प्रवेश नाकारला होता. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. भाजप प्रवेश जाहीर झाल्यानंतर संबंधित प्रकरणाची चौकशी आणि कारवाई थांबवण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा आता राहुल बोंद्रेंना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे माझे कितीही नुकसान झाले तरी आता मागे हटणार नाही, अशी भूमिका राहुल बोंद्रेंनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून जाहीर केली आहे. शिक्षक मतदार संघाच्या प्रचारासाठी काही शाळांना भेटी दिल्यानंतर पोलिसांनी जुन्या प्रकरणात चौकशीसाठी या नोटिसा बजावल्या असल्याचं राहुल बोंद्रे यांनी सांगितलं. त्यामुळे राहुल बोंद्रेंना आता पुन्हा एकदा विविध प्रशासकीय कारवायांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी आपण मनाची पूर्ण तयारी केली असल्याचे यावेळी राहुल बोंद्रे म्हटले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.