ऐनवेळी भाजप प्रवेश नाकारल्यानंतर राहुल बोंद्रेंना पुन्हा एकदा पोलिसांच्या नोटिसा; ‘मी घाबरणार नाही, माझं कितीही नुकसान झालं तरी…’, बोंद्रेंची प्रतिक्रिया

चिखलीचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या शैक्षणिक संस्थांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

ऐनवेळी भाजप प्रवेश नाकारल्यानंतर राहुल बोंद्रेंना पुन्हा एकदा पोलिसांच्या नोटिसा; ‘मी घाबरणार नाही, माझं कितीही नुकसान झालं तरी…’, बोंद्रेंची प्रतिक्रिया
congress leader rahul bondre

बुलढाणा : राहुल गांधींच्या एका फोन कॉलनंतर माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी आपला भाजप प्रवेश नाकारला होता. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. भाजप प्रवेश जाहीर झाल्यानंतर संबंधित प्रकरणाची चौकशी आणि कारवाई थांबवण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा आता राहुल बोंद्रेंना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे माझे कितीही नुकसान झाले तरी आता मागे हटणार नाही, अशी भूमिका राहुल बोंद्रेंनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून जाहीर केली आहे. शिक्षक मतदार संघाच्या प्रचारासाठी काही शाळांना भेटी दिल्यानंतर पोलिसांनी जुन्या प्रकरणात चौकशीसाठी या नोटिसा बजावल्या असल्याचं राहुल बोंद्रे यांनी सांगितलं. त्यामुळे राहुल बोंद्रेंना आता पुन्हा एकदा विविध प्रशासकीय कारवायांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी आपण मनाची पूर्ण तयारी केली असल्याचे यावेळी राहुल बोंद्रे म्हटले आहे.

हेही वाचा : ‘तुमचे फॅन आहोत…तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे’; म्हणत मारेकऱ्यांचा उद्योजक राणा सूर्यवंशींवर कोयत्याने हल्ला

काय आहे प्रकरण ?
चिखलीचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या शैक्षणिक संस्थांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, संबंधित संस्थांना माहिती सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. 1993 पासून संस्थांशी संबंधित विविध कागदपत्रे आणि माहिती पंधरा दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश नोटिशीत देण्यात आल्याचे समजते. अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाने तपासात सहकार्य न केल्याच्या कारणावरूनही पोलिसांनी नोटीस बजावली आहे. बोंद्रे यांच्या शैक्षणिक संस्थांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय निधी मिळवल्याचा तसेच बनावट दस्तऐवज तयार करून शासकीय जमीन बळकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणांमध्ये बोंद्रे सध्या तीन गुन्ह्यांत जामिनावर आहेत. दरम्यान, काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर अडचणी येण्याची अपेक्षा होती, असे बोंद्रे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number