शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर! राजकीय घडामोडींना वेग, पुण्यातील महायुतीच्या पेचावर तोडगा निघणार?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला गेले आहेत. आगामी पुण्यातील विधानपरिषद जागेवरून शिंदे शिवसेनेत नाराजी असल्याचे चित्र आहे. याच विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा हा महत्त्वपूर्ण दौरा मानला जात आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला गेले आहेत. आगामी पुण्यातील विधानपरिषद जागेवरून शिंदे शिवसेनेत नाराजी असल्याचे चित्र आहे. याच विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा हा महत्त्वपूर्ण दौरा मानला जात आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी 4 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

या भेटीत संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीतील जागावाटपावरून सुरू असलेल्या गतिरोधावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीबाबतही पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होऊ शकते.

हेही वाचा- रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच; महेंद्र दळवी आणि अनिकेत तटकरे यांच्यात शाब्दिक चकमक

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली आहे. 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी फक्त शेवटचे दोन दिवस उरले आहेत.

असं असताना पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून युतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. एकीकडे भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे मंगेश चिवटेही निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे राज्यातील विधान परिषदेच्या आगामी निवडणुका आणि जागावाटपावरून महायुतीत असलेल्या पेचावर शिंदेंची पंतप्रधान मोदींसोबतच्या चर्चेत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version