महाराष्ट्र: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीची सर्वात फायदेशीर योजना ठरली. गेल्या काही दिवसांपासून अनेक नेतेमंडळी या योजनेवर भाष्य करताय. मंत्री भरत गोगावले, छगन भुजबळ यांनी देखील या योजनेवर वक्तव्य केलेत. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलंय. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार असं बोललं जात होत. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
महिला आणि दलितांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजना यापुढेही सुरु राहतील. जाहीनाम्यात दिलेल्या आश्वसनांबाबतही त्यांनी आपले मत मांडले आहे.
त्याचबरोबर आम्ही लाडकी बहीण योजना आणि इतर योजना बंद करणार असल्याच्या अफवा आहेत. मला हे स्पष्ट करायचे आहे की, महिला आणि दलित लोकांच्या हितासाठी राबवण्यात आलेली प्रत्येक योजना सुरु राहील. सध्याच्या योजनांव्यतिरिक्त आम्ही आमच्या जाहिरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करु, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
दरम्यान माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सूरू केली असून त्यानुसार ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहेत. त्यामुळे आता काही लाडक्या बहिणींची चिंता वाढतांना पाहायला मिळतेय. 'ज्या महिलांचे अर्ज नियमित नाही. त्यांनी स्वत:हून नावे काढून घ्यावे. अपात्र महिलांनी अर्ज मागे न घेतल्यास दंडासह रक्कम वसुली करावी, असे वक्तव्य छगन भुजबळांनी केल्याने सर्वत्र जोरदार चर्चा सुरूय.