Thursday, November 13, 2025 08:16:09 AM

Devendra Fadnavis: आगामी महापालिका निवडणुकांबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं भाष्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणुकांबद्दल महत्त्वाचं भाष्य केलं आहे. जिथे फायद्याचे असेल तिथे आम्ही युती करू, जिथे फायद्याचे नसेल तर आम्ही युती करणार नाही असं फडणवीस म्हणाले.

devendra fadnavis आगामी महापालिका निवडणुकांबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं भाष्य

 

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणुकांबद्दल महत्त्वाचं भाष्य केलं आहे. जिथे फायद्याचे असेल तिथे आम्ही युती करू, जिथे फायद्याचे नसेल तर आम्ही युती करणार नाही असं फडणवीस म्हणाले. नागपूरमधील निवासस्थानी पत्रकारांशी दिवाळीनिमित्त अनौपचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं  आहे. मुंबईमध्ये शंभर टक्के युती करू, पण मुंबईच्या आसपासच्या महापालिकांमध्ये काही ठिकाणी युती होईल, तर काही ठिकाणी होणार नाही असं ते म्हणाले. त्यांच्या विधानाबाबत त्यांनी उदाहरण देखील दिलं. पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही युती केली तर आमचे लोकं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊन निवडणूक लढतील, मग ती स्पेस आम्ही विरोधी पक्षाला का द्यायची, असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, राज्यात नजिकच्या काळात मंत्रिमंडळात फेरबदल होणार नसल्याचे संकेत देखील त्यांनी दिले. 

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जिथे फायद्याचे असेल तिथे आम्ही युती करू, जिथे फायद्याचे नसेल तर आम्ही युती करणार नाही असे वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवडचे उदाहरण दिले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही युती केली तर आमचे लोकं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊन निवडणूक लढतील. ती स्पेस आम्ही विरोधी पक्षाला का द्यायची. मुंबईमध्ये शंभर टक्के युती करू असे फडणवीसांनी सांगितले आहे. 

मंत्र्यांचे परफॉर्मन्स ऑडिट सतत सुरू आहे.  गुजरातमध्ये अडीच वर्ष झाल्यानंतर बदल झाले. आपल्याकडे अजून एकच वर्ष झाले आहे. त्यामुळे आपल्याकडे वाट पाहावी लागणार असल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. महापालिका निवडणुकांव्यतिरिक्त देखील अनेक गोष्टींवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. 

हेही वाचा: Chandrashekhar Bawankule: सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअॅप..., महसूल मंत्री बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य

काय म्हणाले मुख्यमंत्री? 

शक्तिपीठ महामार्ग - शक्तिपीठ महामार्ग त्याचा मार्ग बदलू शकतो, खासकरून सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये त्यावर विचार सुरू आहे. 

न्यू नागपूर प्रकल्प - 90 टक्के जमीन मालकांचा जमीन देण्यास होकार आहे. मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर बिझनेस डिस्ट्रिक्ट उभारण्याचा प्रयत्न आहे. 

टाटा समूहाची गुंतवणूक - टाटा समूह नागपूरमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. त्याबद्दल त्यांनी सरकारची देखील भेट घेतली. गुजरातच्या एअरबस प्रकल्पात लागणारे काही सुटे भाग ते नागपुरात बनवू इच्छितात. त्यांच्या नागपूरमधील प्रकल्पाची घोषणा तेच करतील.  

नदीजोड प्रकल्प - नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर तयार आहे. मात्र काही परवानग्या प्रलंबित आहेत. मार्चपासून जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरू करू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 

मतदार याद्यांमधील घोळ - काही ठिकाणी त्रुटी आजच्या नाहीत, हे 25 वर्षांपासून सुरू आहे. 2012मध्ये मी स्वतः मुंबई हायकोर्टात याचिका केली, अजून निकाल नाही असेही त्यांनी सांगितले. दोन-तीन ठिकाणी नाव असूनही एकाच व्यक्तीनं अनेकदा मतदान केलं असं होत नाही. 

मतदारयादी घोळ पुरावे - विरोधकांच्या मतदारसंघांमधील याद्या कशा सदोष आहेत, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आम्ही त्या याद्या योग्य वेळी समोर आणू यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे.  

वाढती जातीयता - निवडणुका जवळ आल्यावर जातीचं राजकारण केलं जातं. जात ही मतदारांपेक्षा नेत्यांच्या मनात अधिक आहे. जातींचे प्रश्न आहेत हे मान्य, मात्र त्याचं राजकारण कुणीही करू नये.

दिल्लीत बदली - दिल्लीत बदलीबाबत बोलताना, फडणवीसांनी 2029 पर्यंत मी महाराष्ट्रातच आहे, हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो. परंतु 2029 नंतर काय याचा निर्णय पक्ष घेईल असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. 


सम्बन्धित सामग्री