Friday, May 24, 2024 10:12:43 AM

Devendra Fadnavis three public meetings
देवेंद्र फडणवीसांच्या बुधवारी तीन जाहीर सभा

राज्यातील लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे सभांचा धडाका सुरूच आहे. मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तीन जाहीर सभा होणार आहेत.

देवेंद्र फडणवीसांच्या बुधवारी तीन जाहीर सभा

मुंबई, १४ मे, २०२४, प्रतिनिधी : राज्यातील लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे सभांचा धडाका सुरूच आहे. मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तीन जाहीर सभा होणार आहेत. डहाणू, ठाणे आणि मुंबई या ठिकाणी सभा होणार आहेत. डहाणू येथे हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ फडणवीस सभा घेणार आहेत आणि ठाण्यात नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत तर वरळी येथे यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे आणि त्या ठिकाणी फडणवीसांची सभा होणार आहे. जांबोरी येथील सभेतून फडणवीस यांची तोफ दहाडते याकडे सर्वांचे लक्ष आहे. फडणवीसांच्या वरळीत होणाऱ्या सभेकडे विशेषता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्या ठिकाणी फडणवीस काय बोलतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री