Shambhuraj Desai : शिंदेंच्या शिवसेनेत चाललंय काय? आमदार-मंत्री आमनेसामने भिडले; एकमेकांवर गंभीर आरोप

साताऱ्यात शिवसेनेतील अंतर्गत वाद आता उघड झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडील सभांमधील बॅनर वाद आणि निमंत्रणाच्या मुद्द्यावरून शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांच्यातील घुसफुस पाहायला मिळत आहे.

Shambhuraj Desai : शिंदेंच्या शिवसेनेत चाललंय काय? आमदार-मंत्री आमनेसामने भिडले; एकमेकांवर गंभीर आरोप

साताऱ्यात शिवसेनेतील अंतर्गत वाद आता उघड झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडील सभांमधील बॅनर वाद आणि निमंत्रणाच्या मुद्द्यावरून शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांच्यातील घुसफुस पाहायला मिळत आहे. साताऱ्यातील शिवसेना शिंदे गटातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई हे मला पहिल्यापासूनच वेगळी वागणूक देत असल्याच म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. यावर आता पक्षात कुणालाही डावलण्याचा प्रयत्न केला जात नसल्याचं प्रत्युत्तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं आहे. 

Satara Shivsena Eknath Shinde : “पहिल्यापासूनच मला वेगळी वागणूक देतात” शिंदेंच्या आमदाराचे थेट मंत्र्यांवर आरोप; साताऱ्यातील अंतर्गत नाराजी उफाळणार?

उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. असं असताना साताऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांची सभा पार पडण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे चित्र साताऱ्यात पाहायला मिळत आहे. साताऱ्यात शिंदेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनर वरून आमदार महेश शिंदे यांचा फोटो वगळण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

यावर सातारा जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर कधीच माझा फोटो घेण्यात आला नाही, या अगोदर सुद्धा पहिल्यापासून फोटो नसल्याने आमदार महेश शिंदे यांनी म्हटले. एवढचं नव्हे तर पालकमंत्री शंभूराज देसाई हे मला पहिल्यापासून वेगळी वागणूक देत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. यावर आता शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा- Praniti Shinde: ‘महिला आरक्षणाच्या नावाखाली मोदी-शाहांची स्क्रिप्ट फेल…’; प्रणिती शिंदेंचा RSS आणि भाजपवर घणाघाती आरोप

यावेळी शंभूराज देसाई म्हणाले की, “सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षाचा कार्यक्रम पार पडत आहे आणि पक्षाचे नेते येत असताना तेव्हा निमंत्रण देण्याची पद्धत नसल्याचा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आमदार महेश शिंदेंना लगावला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये झालेल्या शिवसेनेच्या बैठकींना आमदार महेश शिंदे यांना निरोप दिले होते. दरम्यान 2019 ला कोरेगावच्या जागा शिवसेना सुटल्यानंतर मी शिवसेनेमधून ही निवडणूक स्वतःच्या ताकदीवर लढवल्याच्या आमदार महेश शिंदे यांच्या वक्तव्याला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आता उत्तर दिलय.

असल वक्तव्य करुन आमदार महेश शिंदे हे शिवसैनिकांची अवहेलना करतायत.. याचा विचार जिल्ह्यातील शिवसैनिक नक्की करतील… असा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आमदार महेश शिंदे यांना लगावला आहे.” जिल्हा परिषद निवडणुकीपासूनच साताऱ्यामध्ये मंत्री शंभुराज देसाई आणि आमदार महेश शिंदे यांच्यामधील वाद वाढत आहे. दरम्यान आता सभांमधील बॅनर आणि निमंत्रणाच्या मुद्द्यावरून हे मतभेद अधिकच चिघळले असून, दोन्ही नेते आमने-सामने आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number