Jayant Patil: ‘आमदाराच्या बायकोकडून संपादकांना थेट धमकी…’; जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ; मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या नातेवाईकांचा प्रशासनावरील दबाव वाढल्याचा आरोप त्यांनी केला.

Jayant Patil: ‘आमदाराच्या बायकोकडून संपादकांना थेट धमकी…’; जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ; मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राज्यातील सद्यस्थितीवरून सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत टीका केली आहे. चालू अधिवेशनादरम्यान मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी शासकीय कारभाराच्या ढिसाळ नियोजनावर बोट ठेवले. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या नातेवाईकांचा प्रशासनावरील दबाव वाढल्याचा आरोप त्यांनी केला. एका आमदाराच्या पत्नीने थेट वृत्तपत्राच्या संपादकांना दूरध्वनीवरून धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आणत, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संबंधित आमदाराचे नाव जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले.

गुन्हेगारी घटनांवरून सरकारला घेरले; पोलिसांच्या भूमिकेवर संशय
राज्यात घडणाऱ्या विविध गुन्हेगारी प्रकरणांचा संदर्भ देत जयंत पाटील यांनी गृहमंत्रालयाच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला. आपल्या स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या एका गोळीबाराच्या घटनेत स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचे सांगत, त्यांनी यामागे कोणत्या सत्ताधारी आमदाराचा हात आहे, याचा शोध घेण्यासाठी कॉल रेकॉर्ड्स तपासण्याची मागणी केली. ठाण्यातील जमील शेख हत्याकांड तसेच नागपूरमधील कथित आर्थिक तडजोडींच्या प्रकरणांचा उल्लेख करत त्यांनी पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. किरकोळ कारणावरून 9 पोलिसांवर निलंबनाची कारवाई होते, मात्र कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारात संशयितांना मोकळे सोडले जाते, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा – Bachchu Kadu Vs Jaykumar Gore : विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी! बच्चू कडूंचा जयकुमार गोरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव; राजकीय वातावरण तापलं

मंत्र्यांच्या हतबलतेवर आणि पोलिसांच्या हप्तेखोरीवर थेट निशाणा
सभागृहात बोलताना त्यांनी सातारा जिल्ह्यातील एका घटनेचा दाखला देत, मंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांनी बाजूला केल्याचा दावा केला. सत्तेच्या खुर्चीसाठी मंत्र्यांनाही दबावाखाली काम करावे लागत असून, वरिष्ठांकडून दम मिळाल्यामुळे त्यांचे तेवढेच खच्चीकरण झाल्याचे ते म्हणाले. जुगाराच्या अड्ड्यांचे फोटो पाठवूनही कारवाई होत नसल्याचे सांगत त्यांनी पोलिसांच्या वसुली बहाद्दर वृत्तीवर टीका केली. लोकप्रतिनिधींकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना होणारी मारहाण आणि गुन्हेगारांचे वाढलेले धाडस यामुळे महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक बनली असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number